मान्सून चे अंदमान परिसरात आगमन
महाराष्ट्रा : नैऋत्य मोसमी वारे (Monsoon) अंदमान परिसरात वाहू लागले आहे. अंदमान निकोबार येथून केरळमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. अंदमानात सुरु झालेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी जूनचा दुसरा आठवडा लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
‘मोचा’ या चक्रीवादळामुळे अंदमानात भरपूर पाउस पडण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांचा अंदाज लक्षात घेता 21 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यावर्षी अंदमानात दोन दिवस अगोदर आगमन झालेला मान्सून 4 जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होईल. अंदमान-निकोबार आणि बंगालच्या उपसागरात पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून प्रगती करेल.
यंदा मान्सून काळात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये पाच टक्के कमी अधिक होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचेही सावट असण्याची शक्यता आहे.साधारपणे नऊ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल.