June 9, 2023
PC News24
राजकारणशाळा/महाविद्यालय/शैक्षणिकसामाजिक

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

समाज कल्याण विभागाकडून परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू.-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

राज्यात दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत व इतर बहुजन कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.

‘रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही’ अभिनेता भरत जाधव

 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अजून पर्यंत या शिष्यवृत्तीची जाहिरात आलेली नव्हती. सदर योजनेचे अर्ज प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरु करावी व मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी शिष्यवृत्ती च्या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करून किमान ३०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना लागू करावी. या मागणी साठी मागणीसाठी ८ मे रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे *प्रदेश सरचिटणीस सुयश राऊत* यांच्या मार्फत राज्याचे समाज कल्याण आयुक्त, इतर बहुजन कल्याण विभागाचे संचालक व समाज कल्याण केंद्रीय राज्यमंत्री, मा. रामदास आठवले साहेब यांना निवेदन देण्यात आले होते.

राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून दिनांक १८ मे, २०२३ पासून या शिष्यवृत्ती ची प्रक्रिया सुरु करण्यात आली असुन राज्यातील SC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. त्याचबरोबर OPEN कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठीची प्रक्रिया अजुन सुरू झाली नसून या संदर्भात आम्ही उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संचालक यांना लवकरच भेटणार आहोत व खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा लवकरच या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु होईल.

समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थीचे पुणे शहर अध्यक्ष विक्रम जाधव, यश साळुंखे, अजय पवार, ऋषिकेश कडू, जय जगदीश कोंढाळकर, श्रीकांत बालघरे, कार्तिक थोपटे, पार्थ मिटकरी व पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

 

विद्यार्थ्यांच्या अडचणीं संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कायम प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी निसंकोच पणे संपर्क साधावा.अशी माहिती
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,प्रदेशाध्यक्ष, सुनिल गव्हाणे यांनी दिली.

Related posts

ए आयच्या (आर्टिफिशियल इन्टिलिजन्स) जगात कोण टिकेल’? विनायक पाचलग यांचे मार्गदर्शन- पीसीसीओई महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेचे आयोजन

pcnews24

टेस्लाचे अधिकारी येणार भारत दौऱ्यावर

pcnews24

Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा

Admin

तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, ‘या’ 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी

Admin

पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले.

pcnews24

पहिली 2 वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी

pcnews24

Leave a Comment