पुण्यात विविध ब्राम्हण संघटनांतर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न
अखिल ब्राह्मण संघ,पुणे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज 21 बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नारायण पेठेतील सोमवंशी आर्य क्षेत्रीय समाज ट्रस्टमध्ये हा सोहळा संपन्न झाला. उपनयन संस्कार सोहळ्याचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. ग्रॅव्हिटी ग्रुपचे संचालक मिहिर कुलकर्णी यांनी संयोजन केले होते.
गरजू आणि गरीब ब्राम्हण समाजासाठी गेल्या चार वर्षांपासून हा सोहळा करण्यात येतो. यामध्ये मुंबई, पनवेल, कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवड येथील बटू या उपनयन सोहळ्यात सहभागी झाले होते.
गायत्री मंत्राचा शंखनाद करून सोहळ्याची सुरुवात झाली.लक्ष्मीकांत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले.व्रतबंधाचे महत्त्व पंडित वसंतराव गाडगीळ यांनी विशद केले
पंडित वसंतराव गाडगीळ, आमदार रवींद्र धंगेकर, हेमंत रासने, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, रणजीत नातू, अखिल भातीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, संजय सुपेकर (गंगाखेड) उपस्थित होते.