May 30, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

IPL सट्टाबहाद्दरांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

IPL सट्टाबहाद्दरांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यातील सहा जणांना अटक केली आहे.ही कारवाई मारुंजी रोड हिंजवडी येथे करण्यात आली. आरोपींकडून चार लाख 81 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आशिष निरांजण देशमुख (वय 28, रा. अकोला), महेश परमेश्वर काळे (वय 33, रा. अकोला) वैभव बाबाराम डिक्कर (वय 28, रा. अकोला), सचिन गंगाराम आजगे (वय 23, रा. धुळे), विकास कैलास लेंढे (वय 22, रा. राहु पिपळगांव पो. कोरेगाव ता. दौड, जि. पुणे), ओमकार बिरा भांड (वय 20, रा. राहु पिपळगांव पो. कोरेगाव, ता. दौड, जि. पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याबरोबर प्रकाश भगवानदास तेजवाणी, राम भानुशाली, विकास रायसिंग चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, मारुंजी रोड हिंजवडी येथे एका सोसायटीमध्ये काहीजण कोलकाता नाईट रायडर्स लखनऊ सुपर जॉइंट्स आयपीएल क्रिकेट मॅच वर ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, तेरा मोबाईल फोन, एक वाय फाय, चार नोटबुक असा एकूण चार लाख 81 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी यांच्या पथकाने केली (Hinjawadi ) आहे.

Related posts

चिंचवड मध्ये सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून तरुणीला मारहाण करण्याचा प्रयत्न

pcnews24

पिंपरी चिंचवडमध्ये 125 इमारती धोकादायक

pcnews24

शिक्षकांसाठी खुषखबर !! पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 209 पदांवर भरती- ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

pcnews24

कंपनीमधील ॲल्युमिनियम साहित्याची चोरी …

pcnews24

जबरी चोरी व घरफोडी करणारी आंतर राज्यीय टोळी जेरबंद आरोपींकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस व 35,83,300 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

pcnews24

POCSO कायद्यांतर्गत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आंध्र प्रदेश हायकोर्टाने आज POCSO कायद्यांतर्गत ‘पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार’ सिद्ध करण्याच्या उद्देशासाठी वीर्य आवश्यक नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

pcnews24

Leave a Comment