चिखलीत गोळी घालून मित्राची हत्या
भर दिवसा मित्राने 20 वर्षीय मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चिखली (PCMC) येथे घडला. मित्र व त्याचा साथीदार मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले आहे. ही घटना आज (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मोई), सिद्धार्थ कांबळे या दोघांनी कृष्णा उर्फ सोन्या तापकीर (वय 20) राहणार चिखली याच्यावर सोमवारी दुपारी गोळ्या झाडल्या.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णा याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. सौरभ पानसरे आणि कृष्णा तापकीर हे मित्र आहेत.
गोळ्या झाडून हत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नसून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.