पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 387 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी ऑनलाइन परीक्षा
पिंपरी चिंचवडच्या विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 15 संवर्गातील रिक्त 387 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी तीन संत्रांमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहे. राज्यातील 26 केंद्रावर परीक्षा होणार असून 98 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ब’ आणि ‘क’ गटातील 387 रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने 13 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. विविध पदांची संख्या खालीलप्रमाणे : लिपिक-213
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 75 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- 41
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 18 आरोग्य निरीक्षक-13
अतिरिक्त कायदा सल्लागार,
विधी अधिकारी, उपमुख्य अग्शिमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी , उद्यान अधिक्षक (वृक्ष)
प्रत्येकी 1 तर
सहाय्यक उद्यान अधिक्षक 2
उद्यान निरीक्षक- 4
हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8
कोर्ट लिपिक -2
अॅनिमल किपर -2
समाजसेवक – 3
ऑनलाईन प्राप्त झालेल्या 1 लाख 30 हजार 470 अर्जांपैकी छाननीत 85 हजार 771 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत. त्यामुळे 387 जागांसाठी 85 हजार 771 परीक्षार्थी असणार आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 शहरातील 98 परीक्षा केंद्र सुनिश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर ECIL कंपनीमार्फत Mobile Jammer लावण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी Frisking, CCTV, IRIS Scanner इ. सुविधा करण्यात आलेल्या आहेत.
सर्व परीक्षा केंद्राच्या जिल्हा पोलीस प्रमुख व पोलीस आयुक्तांना आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार दिव्यांगाकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आवाहन केले आहे की ही परीक्षा सरळसेवा भरती आणि पारदर्शक पध्दतीने आयोजित केली असल्यामुळे कुठल्याही अमिषाला किंवा गैरप्रकाराला बळी पड नये.