आता ईडीकडे कुठलेच प्रश्न शिल्लक नसतील-जयंत पाटील
आयएल व एफएस घोट्याळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ईडीच्या 9 तास चाललेल्या चौकशीदरम्यान सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. चौकशी संपताच बाहेर आलेल्या पाटील यांनी आता ईडीकडे कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील, मी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान ईडी कार्यालयात बसून अर्धे पुस्तक वाचून झाले, असेही ते म्हणाले.