पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न..? भरदिवसा एका युवकावर झाडल्या गोळ्या
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावठाण परिसरात सोण्या तापकीर ह्या युवकाचा ,भरदिवसा ढवळ्या बंदुकीतून गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींनी आज दुपारी सोन्या तापकीर वर बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार करुन खून केला आहे. ह्या गोळीबारात सोन्या तापकीर गंभीर जखमी झाला होता, मात्र पुढे उपचारादरम्यान त्यांचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ह्या गोळीबारात आणि खुनाच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसापूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीत शिरगाव येथील सरपंच प्रवीण गोपाळे याची गोळीबार करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती, त्यानंतर आज पुन्हा एकदा चिखली परिसरात सोन्या तापकीर या तरुणावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सतत होणाऱ्या गोळीबार आणि खुनाचा घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत.