जिओमार्टने 1 हजार कर्मचाऱ्यांना काढले
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओमार्टने 1 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. जिओमार्टमध्ये जवळपास 15 हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यातील अनेकांना नोकरीवरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. रिलायन्सने काही दिवसांपूर्वी मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचे अधिग्रहण केले. तसेच यातील 3,500 कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत सामील केले. दरम्यान जगभरात अनेक मोठ्या कंपन्या सध्या कर्मचारी कपात करत आहेत.