‘द केरळ स्टोरी’ 200 कोटीच्या क्लबमध्ये
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहेत. त्याने काल (22 मे) रोजी साडे चार कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर तो 200 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचे आता पर्यंतचे कलेक्शन हे 203.47 कोटी रुपये झाले आहे. तसेच, या चित्रपटाने ऑलटाईम ब्लॉकबस्टरचा किताबही संपादन केला आहे. शाहरुखच्या पठाण नंतर 2023 चा हा दुसरा चित्रपट आहे ज्याने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.