December 11, 2023
PC News24
जिल्हावाहतूक

पुण्यात उद्या पासून सलग 3 दिवस हेल्मेटची ,प्रभावी अंमलबजावणी होणार-जिल्हाधिकारी यांचे आदेश

पुण्यात उद्या पासून सलग 3 दिवस हेल्मेटची ,प्रभावी अंमलबजावणी होणार-जिल्हाधिकारी यांचे आदेश

संयुक्त राष्ट्र जागतीक सुरक्षा सप्ताहाच्या(7 UN Global Rond Safety Week 2023 ) अनुषंगाने दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय कार्यालयात येताना दुचाकी वाहन चालविणाऱ्या नागरिक / कर्मचारी / अधिकारी यांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे.

Transport या विषयासंदर्भात 7 UN Global Road Safety Week 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. भारतात दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. आपल्यापैकी बहुतांश जण या घटना नेहमीचीच गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांसाठी हा एक मोठा मानसिक व आर्थिक धक्का असतो. यासाठी जागतिक स्तरावर यावर्षीही दिनांक १५.०५.२०२३ ते २१.०५.२०२३ या कालावधीत
Sustainable Transport या विषयासंदर्भात 7 UN Global Road Safety Week 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. केवळ जागरूकता वाढवणे हाच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमीना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हे यात अंतर्भूत आहे.

वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तीमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाच्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते.

मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. याद्वारे पुणे जिल्ह्यातील फक्त सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणान्या व दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांना सुचित करण्यात आले आहे की, शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्यकर्तव्य आहे. जनतेस मार्गदर्शक ठरावे यादृष्टीने तसेच स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात येताना जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकी वाहन वापरतांना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या शासकीय कार्यालयात दुचाकीवर येणारे शासकीय अधिकारी / कर्मचारी हे नियमितपणे हेल्मेटचा वापर करीत असले तरी, हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील फक्त सर्व शासकीय आस्थापनांना आदेशीत करण्यात आले आहे. जे शासकीय अधिकारी/कर्मचारी दुचाकीवरून कार्यालयात येतात अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक २४.०५.२०२३ रोजी हेल्मेट परिधान करावे. तसेच सर्व कार्यालयप्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरुन येणारे सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी हेल्मेट परिधान करतील याबाबतच्या सूचना आपल्या स्तरावरुन पारित करण्याचे आदेश दिले आहेत.या अंमलबावणी करिता 600 अतिरिक्त ट्रॅफिक पोलीस नेमले आहेत.
दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी/कर्मचारी/ नागरीक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील.अशी माहिती डॉ. राजेश देशमुख जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, पुणे यांनी दिली आहे.

Related posts

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी भरणार भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन,महिलांना सहभागी होण्याचे आवाहन.

pcnews24

तोतया आयएएस अधिकारी तायडे यांस तळेगांव दाभाडे येथे अटक

pcnews24

पुण्यात शिवशाही बसचा अपघात

pcnews24

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या,पुणे पोलीस आयुक्तालयातील 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

pcnews24

वाहन चालकाकडून पैसे घेतल्याने 2 पोलीस निलंबित (व्हिडिओ सह)

pcnews24

Leave a Comment