UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींचा डंका
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Result) सन 2022 मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी देशातील पहिले तीन क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. तर राज्यात देखील पहिले तीन उमेदवारही मुलीच आहेत.
देशभरातिल पाहिले तीन क्रमांक असे आहेत.१)ईशिता किशोर २)गरिमा लोहिया ३)उमा हारथी
तर राज्यातून प्रथम क्रमांक कश्मीरा संखे, द्वितीय क्रमांक रीचा कुलकर्णी असे आहेत.
निकाल आयोगाच्या http//www.upsc.gov.in. या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
यंदाच्या परीक्षेत एकूण 933 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यामध्ये 345 उमेदवार सर्वसाधारण गटातले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील 99 उमेदवार आहेत. इतर मागासवर्गीय गटातील 263 तर अनुसूचित जातीचे 154 आणि अनुसूचित जमातीतील 72 उमेदवार यंदा निवडले गेले आहेत यावर्षीची प्रवेश परीक्षा येत्या 28 मे रोजी होणार आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (आय ए एस), भारतीय परदेश सेवा (आय एफ एस), भारतीय पोलिस सेवा (आय पी एस) आणि केंद्रीय सेवा, श्रेणी अ आणि ब एकूण 933 उमेदवारांची (UPSC Result) नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार, आयोगाने उमेदवारांची एक समग्र आरक्षित सूची तयार केली आहे.
विविध सेवा विभागातील नियुक्त्या तिथे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार केल्या जातील. त्यासाठी परीक्षेच्या नियमांमध्ये असलेल्या तरतुदींचा विचार करण्यात येईल.