February 26, 2024
PC News24
पिंपरी चिंचवडमहानगरपालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन
प्रत्येक महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभा झाली.या सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद अभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ४१ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ८, ४०, ६, २, ३, १३ आणि ५ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
त्यामध्ये पावसाळ्या आधी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्यात यावी तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यांची साफसफाई करण्याबाबत, पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. नादुरुस्त पदपथ दिवे दुरुस्थ करण्यात यावे, पाणी गळती बाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.जनसंवाद सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिका-यांनी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

Related posts

कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज – उपचारासाठी 22 जणांना वायसीएम रुग्णालयात दाखल

pcnews24

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे पिंपरी चिंचवड शहरात आयोजन, एकूण २२ ठिकाणी कार्यक्रम.

pcnews24

आता चेंडू महापालिकांच्या कोर्टात – राज्यातील प्रमुख सर्व महापालिका हद्दीतील घरे नियमितीकरण प्रक्रियेस नवीन शासन निर्णयामुळे वेग. प्रशमन शुल्क व विकास शुल्क नाममात्र असावे या बाबत आमदारांची भूमिका ठरणार महत्वाची. – विजयकुमार पाटील

pcnews24

‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा, राहुल सोलापूरकर प्रमुख वक्ते.

pcnews24

महापालिका राबविणार महिलांसाठी ‘ या ‘ योजना..31 ऑगस्टपर्यंत अर्ज मुदत

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  मालमत्तेचे सर्वेक्षण आता ‘ड्रोन’द्वारे.

pcnews24

Leave a Comment