चिंचवड मध्ये सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून तरुणीला मारहाण करण्याचा प्रयत्न
तरुणीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला या एका क्षुल्लक कारणावरून, तरुणाने थेट तरुणीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालत मारहाण केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) चिंचवड येथे लिंकरोडवर घडला आहे.
याप्रकरणी पीडितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शारुख हुसेन शेख (वय 30 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये आरोपी शारुख हुसेन शेख राहतो. त्याने फिर्यादीला मोबाईल नंबर मागितला यावेळी फिर्यादीने त्याला नकार दिला. याचा राग डोक्यात घेवून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत धमकी दिली. हातातील सिमेंट ब्लॉकने डोक्यात मारून जखमी केले. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.