चिंचवड मध्ये विहार सेवा ग्रुपचे महाराष्ट्रातून १४०ग्रुप उपस्थित, वार्षिक संमेलन भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न
महाराष्ट्रातून प्रथमच 140 विहार सेवा ग्रुप मधील सदस्यांच्या उपस्थितीत
चिंचवड येथे विहार सेवा ग्रुपचे वार्षिक संमेलन भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
विहार सेवा ग्रुपचे हे संमेलन प्रवचनशिखर, विहार सेवा ग्रुप चे आद्यप्रणेता प.पु. आचार्यदेव श्रीमद विजय महाबोधिसूरि महाराजा यांच्या सान्निध्यात संपन्न झाले. याप्रसंगी सुरुवातीला सकाळी 8 वाजता प. पु. गुरूदेव श्री सकल संघ तसेच विहार सेवक चिंचवडगाव जैन मंदिरा पासून मिरवणुकीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह संमेलन ठिकाणी आले.यानंतर गुरूवंदन, मांगलिक,श्रेष्ठिवर्य श्रीमान भागचंदजी सोनीगरा याच्यां हस्ते दीपप्रज्वलन होऊन संमेलनास प्रारंभ झाला. कार्यक्रमात भक्तीगीते निखिल सोनीगरा यांनी सादर केली. प. पु. आचार्यदेव श्रीमद विजय महाबोधिसूरि प्रवचनात म्हणाले, साधुसंता विषयी आदर आणि सेवा करण्याची भावना सर्वच विहार सेवकामध्ये आहे हे अत्यंत अभिनंदनीय आहे.
सकाळी व संध्याकाळी जास्तीत जास्त विहार सेवा देणाऱ्या विहार सेवकांचा सन्मान तसेच सर्व 140 विहार सेवा ग्रुप चा सन्मान सोनीगरा परिवार, निगडीच्या वतीने करण्यात आला.
विहार सेवा ग्रुप संमेलनास पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरातील जैन संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन, स्वागत, आणि विहार सेवेसाठी शुभेच्छा देऊन संमेलनाचा समारोप झाला. विहार सेवा ग्रुप संमेलनाचे संयोजन उदार ह्रदयी श्रेष्ठिवर्य केतुलभाई सोनिगरा व नियोजन भद्रेशभाई शहा आणि पी.सी.एम.सी. विहार सेवा ग्रुप यांनी केले.
कार्यक्षेत्र, ज्ञानाचे क्षेत्र, कल्याण मित्र, भावना, विश्वास, भविष्य, हि क्षेत्रे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत सर्वांनी विहार ग्रुप मध्ये सहभागी व्हावे. यानंतर मोहिलसर यांच्या ग्रुप चे जैन भक्तीगीतावर नृत्य सादर झाले.कार्यक्रम सूत्रसंचालन ओमजी आचार्य यांनी केले.