ग्राहकांना मोबाईल नंबर सक्तीने मागू नका
दुकानात किंवा मॉलमध्ये सामान खरेदीसाठी गेल्यानंतर अनेकदा आपल्याला बिल करताना मोबाईल नंबर विचारला जातो. मात्र ग्राहक व्यवहार मंत्रालयाने रिटेलर्सना ग्राहकांचे मोबाईल क्रमांक सक्तीने मागू नका, असे निर्देश दिले आहेत. मोबाईल नंबर सांगितल्याशिवाय बिलिंग होणार नाही, असे ग्राहकांना रिटेलर्सकडून सांगितले जाते. यासंबंधित अनेक तक्रारी व्यवहार मंत्रालयाकडे आल्या आहेत. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले.