१८ वर्षांनंतर आपले नाव मतदार यादीत थेट सामील होईल.
वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव नोंदवण्यापासून लवकरच सुटका होणार आहे. १८ वर्ष पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत नाव नोंदवले जाईल, अशी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकार याबाबतचे विधेयक संसदेत मांडणार आहे. देशातील नागरिकांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी मतदार यादीला लिंक केल्या जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे.