दोन अपयशानंतर तिसऱ्यांदा मिळालेले यश देशात UPSC परीक्षेत प्रथम-ईशिता किशोरने.
ईशिता किशोरने यूपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ईशिताला यूपीएससी परीक्षेत दोनदा अपयश आले होते. त्यावेळी तीचे कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे यूपीएससीत यश आल्याचे ईशिताने म्हटले आहे. ईशिताने घरीच दररोज आठ ते नऊ तास अभ्यास केला. कधीही मोजून अभ्यास करू नका, वेळापत्रक बनवा व त्याचे पालन करा, प्राधान्यक्रम ठरवा, असा सल्ला ईशिताने विद्यार्थ्यांना दिला आहे.