अभिनेते नितेश पांडे यांचे निधन
बॉलिवूड अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टीव्हीवरील ‘अनुपमा’ या मालिकेतील भूमिकेने ते लोकप्रिय झाले. त्यांनी ‘रंगून’, ‘हंटर’, ‘ओम शांती ओम’, ‘दबंग 2’, ‘बाजी’ यासारख्या अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. तर ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘हम लडकिया’, ‘साया’, ‘महाराज की जय हो’ यासह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.