June 9, 2023
PC News24
गुन्हाजिल्हा

चाकण(म्हाळुंगे) परिसरातील गुंडाला पिस्तुल बाळगल्या प्रकरणी अटक

चाकण(म्हाळुंगे) परिसरातील गुंडाला पिस्तुल बाळगल्या प्रकरणी अटक

चाकण परिसरातील सराईत गुंडाला पिस्तुल बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी खेड तालुक्यातील कोरेगाव येथून अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 23) येथे करण्यात आली.आकाश आण्णा भोकसे (वय 23, रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांना माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर. उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष काळे, विठ्ठल वडेकर किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, आमोल माटे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, राहुल मिसाळ, शरद खैरे यांच्या पथकाने केली आहे.

कोरेगाव खेड येथील कॉर्निंग कंपनीजवळ आकाश भोकसे हा
पिस्तुल घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आकाश हा कंपनी जवळ आला असता त्याने पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी आकाश हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सन 2017 मध्ये त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच सन 2022 मध्ये खेड पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा एक गुन्हा दाखल आहे.

Related posts

हिंजवडी:जीवे मारण्याची धमकी देत महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी

pcnews24

चिंचवड:सरकारी कामाच्या टेंडर बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

pcnews24

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

एटीएसच्या तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर…शास्त्रज्ञ कुरुलकर ISIच्या संपर्कात..!

pcnews24

बेकायदेशीर गॅस cylinder रिफिलिंग करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई.

pcnews24

Leave a Comment