तरुणीची भीमा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या
पुण्याच्या दौंड परिसरात एक दुर्दैवी घटना उघडकीस झाली आहे. 17 वर्षाच्या तरुण बहिणीने भावाच्या नावाने एक चिठ्ठी लिहून स्वतःला संपवले. नाजूका शामराव ननावरे असे या बहिणीचे नाव आहे. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
नाजूकाने भीमा नदी पात्रात उडी मारली असल्याची माहिती तिचा भाऊ जो पुण्यात कामाला आहे त्याला मिळाली. त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नाजुकाची दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर नातेवाईकांनी नदीपात्रात शोध घेतला असता नाजुकाचा मृतदेह आढळला.दरम्यान घटने आधी नाजूका हिने आपल्या भावासाठी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ” मी,तुला दुखावले आहे.मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असं वाटतं की माझा जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठे आहे म्हणून तू माझ्यासाठी एवढं सगळं करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचं. पण जाऊ दे, तू स्वतःची काळजी घे.” असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. दरम्यान नाजुकाच्या ने अचानक केलेल्या अश्या कृत्यामुळे संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे.