दूर्दैवी प्रकार ,मुलानेच बापाला ट्रॅक्टरखाली चिरडले.
सांगलीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. जमीन नावावर करत नाही, पैसेही देत नाही या कारणातून मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले आहे. ही घटना मिरज तालुक्यातील बेडी येथे आज (24 मे) सकाळी घडली आहे. दाजी गजानन आकळे (वय 70) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण आकळे याला अटक केली आहे.. याप्रकरणात मुलाविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.