आणि जावयाने पाडले सासूचे 2 दात,काय घडलाय नक्की प्रकार?
खडकी येथे घरजावयाला सासूने घरात राहू नको असे म्हटले होते. त्यानंतर घरजावयाला सासूचा राग आल्याने त्याने सासूचे दोन दात पाडल्याची घटना घडली आहे. तसेच सासूच्या अंगावर घरजावयाने गरम पाणी ओतले. तिचे डोके फरशीवर आपटत त्याने तिचे दात पाडले. याप्रकरणी महेंद्र सिध्दनाथ तोरणे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. जखमी सासूचे नाव सुजाता शिंदे असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरजावई तोरणेला अटक केली.