Netflix पासवर्ड शेअर करताय ? आता मोजावे लागतील जास्तीचे पैसे.
Netflix ने मंगळवारी कंपनी आता युजर्सना आपला पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार आहे. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. कंपनीने नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगला पेड सर्व्हिसमध्ये रुपांतरित केलं आहे. युजर्सना आणखी एका सदस्याला जोडण्यासाठी महिन्याला 7.99 डॉलर म्हणजेच 660 रुपये खर्च करावे लागतील. सध्या ही योजना फक्त अमेरिका आणि युरोपातील देशांमध्ये लागू असून लवकरच भारतात लागू होऊ शकते.