वारजे येथे रस्त्याच्या कडेला सापडली दोन दिवसांची बेबी गर्ल
पुणे : वारजे येथील डुक्करखिंड ते वारजे चौकाच्या रस्त्याच्या कडेला दोन ते तीन दिवसाची बेबी गर्ल आढळली आहे. या घटनेमुळे त्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथील सर्व्हे नंबर 7/8 डुक्कर खिंड ते वारजे चौका दरम्यान सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना हे बाळ आढळले.त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारजे पोलिसांना माहिती कळवली.
वारजे पोलिसांनी अशी माहिती दिली की, मिळालेल्या माहितीच्या आधारे आमची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बाळाला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले असून बाळाची तब्येत उत्तम आहे.तसेच रस्त्याच्या कडेला बाळाला सोडणाऱ्या आई वडिलांचा शोध घेतला जात आहे.