June 9, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

कंपनीमधील ॲल्युमिनियम साहित्याची चोरी …

कंपनीमधील ॲल्युमिनियम साहित्याची चोरी …
देहूगाव विठ्ठलवाडी येथील अग्रवाल मेटल्स या कंपनीमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.
अटक केलेला चोरटा त्याच्या अन्य दोन साथीदारां सोबत मिळून देहूगाव येथील अग्रवाल मेटल्स या कंपनीमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी करत होता.
सोनूकुमार श्रीराम सुंदर सरोज (वय 22, रा. विठ्ठलवाडी देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दस्तगीर रशीद पठाण (वय 47, भोसरी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची देहूगाव विठ्ठलवाडी येथे अग्रवाल मेटल्स नावाची कंपनी आहे. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या कंपनीत चोरी करण्यासाठी शिरले.
दोघेजण कंपनीत गेले तर तिसरा कंपनीच्या बाहेर थांबून पाहणी करत होता. आरोपींनी 24 हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी करून नेले. हा प्रकार निदर्शनास येताच फिर्यादी यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादी यांच्यावर दगडफेक करून साहित्य चोरून नेले. दरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

pcnews24

“मेरी लाईफ,मेरा स्वच्छ शहर” उपक्रमा अंतर्गत “RRR केंद्र” स्थापन होणार..

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये अजुन ही कोयत्याची दहशत.

pcnews24

दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास

pcnews24

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

pcnews24

काळेवाडी फाटा ब्रिजवर भरधाव दुचाकीस्वाराचा मृत्यू

pcnews24

Leave a Comment