आज सकाळी पुण्यात आग लागल्याचे वृत्त
पुण्यात आज पहाटे भीषण आग लागली आहे. भवानी पेठेच्या टिंबर मार्केटमध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे. लाकडाच्या गोदामाला लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे मुंबईच्या चेंबूर स्वास्तिक चेंबर येथेही आज सकाळी आग लागली होती.