December 11, 2023
PC News24
गुन्हाजिल्हा

पत्नी आणि सासुरवाडीचा त्रास, पतीचा गळफास; पुण्यात हडपसर येथील घटना

पत्नी आणि सासुरवाडीचा त्रास, पतीचा गळफास;
पुण्यात हडपसर येथील घटना

पत्नी आणि तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अभय संजीवराव गवळी (वय 41, रा. भंडलकरनगर, शेवाळवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभय गवळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी पत्नी तृप्ती, सासू, जालिंदर आंबवडे, संतोष आंबवडे, आणि एक महिला (रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभय गवळी यांचे भाऊ सतीश (वय 43, रा. मासुळकर काॅलनी, पिंपरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभय यांचा नऊ वर्षांपूर्वी तृप्ती हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. वादातून तृप्ती आणि तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी अभय यांना त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरकडील नातेवाईकांचा संसारात हस्तक्षेप वाढल्याने अभय यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Related posts

पुणे ग्रामीण पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

pcnews24

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगांव निवासस्थानी १८ तास वाचन उपक्रम.

pcnews24

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’.

pcnews24

आरबीआयचा PayTm पेमेंट्स बँकेला दणका,ठोठावला दंड

pcnews24

पुणे शहर:कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईस सुरवात..सात जण निलंबित

pcnews24

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक;५ कोटींचा अपहार.

pcnews24

Leave a Comment