‘३० मुलींनाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या त्या’ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.
दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सीरियल किलर रवींद्र कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींची हत्या आणि अत्याचाराचा आरोप होता. तसेच 2008 ते 2015 या कालावधीत 30 मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. धक्कादायक म्हणजे त्याने अत्याचार केलेल्या मुलींमध्ये सर्वात लहान पीडित 6 वर्षांची आणि सर्वात मोठी 12 वर्षांची होती.