पिंपरी चिंचवडमध्ये 125 इमारती धोकादायक
पिंपरी चिंचवड येथे 125 इमारती धोकादायक परिस्थितीत असल्याचे समोर आले आहे. पावसाळा जवळ आल्याने महापालिकेने सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. इमारतीतील लोकांना इमारतीची दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती किंवा इमारतींचा धोकादायक भाग कोसळण्याची शक्यता असल्याने हा सर्व्हे केला जातो.