ग्राहक मंच तर्फे SBI ला 2 लाखांचा दंड
क्रेडिट कार्ड एक्सपायर झाल्यानंतरही ग्राहकाला बिल पाठवल्याप्रकरणी एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट्स सर्व्हिसेसला दिल्लीच्या ग्राहक मंचाने दोषी ठरवले आहे. तसेच ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश बँकेला दिले आहेत. एसबीआयने ग्राहकाला बिल पाठवले होते. तसेच ते बिल न भरल्याने त्याला काळ्या यादीतही टाकले होते. विशेष म्हणजे तक्रारकर्त्या ग्राहकाने 2016 नंतर कार्डचा वापर केला नव्हता.