पुण्यात शिवशाही बसचा अपघात
पुण्यात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात 25 प्रवासी बचावले आहेत. ब्रेक फेल झाल्याने बस थेट फूटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत बसचे मोठे नुकसान झाले असून झाडेही जागच्या जागी आडवी झाली होती. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात आज सकाळी हा अपघात झाला.