पिंपरी चिंचवड मधील महाविद्यालयात घडला हा प्रकार.
एका व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेतल्याचा प्रकार समोर आले आहे. पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळूर येथे सिंबायोसिस आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये 4 मुलांना त्याने प्रवेश मिळवून दिला व त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून राहुल राजेंद्र पालांडे याला अटक करण्यात आली.