नागपूर मधील श्री.गोपाल कृष्ण मंदिरासाठी वस्त्रसंहिता लागू
मंदिरात तोकडे कपडे घालून गेल्याने अनेकदा वाद घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशातच नागपूरच्या श्री गोपाल कृष्ण मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंदिर परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. अनेक विश्वस्तांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. या संहितेत मंदीरात फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास मनाई करण्यात आलेली आहे.