समाजवादी नेते रवींद्र वैद्य यांचे निधन
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि पत्रकार रवींद्र वैद्य यांचे आज पहाटे साडेबारा वाजता जव्हार येथे निधन झाले. 90 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.