December 11, 2023
PC News24
जिल्हासामाजिक

बुधवार पेठेतील महिलांसाठी असाही एक हात मदतीचा,मंथन फाउंडेशन व महाएनजीओ फेडरेशनचा उपक्रम

बुधवार पेठेतील महिलांसाठी असाही एक हात मदतीचा,मंथन फाउंडेशन व महाएनजीओ फेडरेशनचा उपक्रम

मा. श्री शेखरजी मुंदडा यांच्या प्रेरणेने आणि भगीरथ तापडिया ट्रस्ट यांच्या सहाय्याने व महा एनजीओ फेडरेशन च्या माध्यमातून बुधवार पेठेतील “मंथन फाउंडेशन” संस्थेशी जोडल्या गेलेल्या ९० एचआयव्ही सह जगणाऱ्या महिलांना एक महिना पुरेल इतके रेशन किटचे वाटप दि.२२ मे २०२३ रोजी करण्यात आले. हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२२ पासून प्रत्येक महिन्यात सुरू असून संपूर्ण एक वर्ष चालू ठेवण्याचा महाएनजीओ फेडरेशनचा मानस आहे. या पोषण आहार किट मध्ये गहू, डाळ, सोयाबीन, तांदूळ, तेल, राजगिरा लाडू, मटकी इत्यादी पौष्टिक आहाराचे पदार्थ समाविष्ट केलेले असून एचआयव्ही रुग्णांच्याच्या मूलभूत गरजांचा विचार करण्यात आलेला आहे. कार्यक्रमा दरम्यान मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई भट्ट यांनी मंथन संस्थेच्या कामाबद्दलची सविस्तर माहिती दिली. तसेच वारंगना व्यवसायातील स्त्रियांच्या समस्या देखील मांडल्या. समाजातील विविध घटक एकत्र येऊन काय विधायक काम करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. पोषण आहार किट वाटप कार्यक्रमा नंतर महा एनजीओ फेडरेशनच्या टीमने वस्तीमधील काही महिलांशी त्यांच्या घरात जाऊन प्रत्यक्ष सवांद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. प्रत्येकीची व्यथा आणि रोजचं जीवन जगण्याची धडपड बघून सर्वजण सामाजिक परिस्थिती बद्दल अधिकच जागरुक झाले आहेत. हा सामाजिक उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श घालून देणारा व प्रेरणादायी आहे.

मंथन फाउंडेशन व महा एनजीओ परिवारातर्फे आम्ही भगीरथ ट्रस्ट, राजेंद्रजी तापडिया व अंजली ताई तापडिया यांचे ऋणी आहोत. भगीरथ तापडिया यांच्या वतीने श्रीसिंहजी व विक्रमजी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी *महा एनजीओ फेडरेशन चे संचालक मुकुंदजी शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, प्रशासकीय अधिकारी राहुलजी जगताप तसेच CSR हेड पायलताई मुजुमदार* हे उपस्थित होते.
कविता सुरवसे मंथन फाउंडेशन प्रकल्प व्यवस्थापक यांनी आभार मानले. सर्व मंथन टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली.

Related posts

स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका 1 लाख रुपये

pcnews24

महापालिकेच्या वतीने पंचप्रण शपथ घेऊन’मेरी माटी मेरा देश’,अभियानास सुरूवात.

pcnews24

तळेगाव:जनरल मोटर्स कंपनी बंद विरोधात तळेगाव ते मंत्रालय पायी धडक मोर्चा.

pcnews24

शनिवारी मराठा संघटनांकडून पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन.

pcnews24

पुणे:मंथन फाउंडेशन तर्फे ट्रक चालकां सोबत एचआयव्ही व एड्स सुरक्षिततेचा संदेश देत रक्षाबंधन उत्साहात साजरा.

pcnews24

मावळ:पुरेसा पाऊस न पडल्याने पाणी कपातीचे संकट.

pcnews24

Leave a Comment