सावरकर जयंतीला व्याख्यान,शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे आयोजन
सावरकर जयंतीला म्हणजे दिनांक रविवार २८मे रोजी शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ या संस्थेतर्फे व्याख्यान आयोजित केले आहे ज्येष्ठ व्याख्याते श्री शिरीष श्रीधर आपटे ह्यांचे सावरकर- आक्षेप व खंडन या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ यांच्यातर्फे गेली ६ वर्षे स्वा. विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी केले जाते.यामधे संस्थेच्या वसतिगृहातील सर्व युवक ह्यात उत्साहाने भाग घेतात.
ह्या वर्षी हा कार्यक्रम केंघे ब्राह्मण वसतीगृह पटांगण
५५५ नारायण पेठ येथे सकाळी ९ वाजता स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात होईल अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी दिली.