निती आयोगाची बैठक सुरु
दिल्लीच्या प्रगती मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक सुरु झाली आहे. ‘विकसित भारत-2047 : रोल ऑफ टीम इंडिया’ या विषयावर आधारित ही गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक आहे. यामध्ये ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्यासह 8 राज्यातील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली नाही. या बैठकीत 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.