हा आहे नविन मुद्रा लोन चा फसवणूकीचा मेसेज, नक्की वाचा
सोशल मीडियावर तुम्हाला जर मुद्रा लोन संदर्भात मेसेज दिसला असेल तर सावध व्हा. सध्या सोशल मीडियावर एक नोटिफिकेशन खूप व्हायरल होत आहे, यामध्ये 1750 रुपये जमा केल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र सरकारच्या ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने हा दावा फेटाळला आहे. सरकारने अशी कोणतीही योजना आणली नाही, त्यामुळे या मेसेजकडे दुर्लक्ष करा, अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.