‘मोदींनी राज्याच्या अडचणी जाणून घेतल्या’
निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यासाठी मांडलेल्या भुमिकांवर पत्रकार परिषदेत भाष्य केले. “आज विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. राज्य सरकारच्या अडचणी, समस्या नरेंद्र मोदींनी जाणून घेतल्या. महिला सक्षमीकरण, तरूणांचा कौशल्य विकास, नोकरी, राज्यात गुंतवणूक कशी येईल तसेच कोकणातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्यावर चर्चा झाली,” असे ते म्हणाले.