स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी यांच्यातर्फे सावरकर जयंती रक्तदान करून साजरी
पिंपरी चिंचवड : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अश्यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’ निगडी, पुढे सरसावले आहे, मंडळाने सावरकर जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त, जनकल्याण रक्त केंद्र, नगर यांच्या सहकार्याने आज (दि.27) स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे 34 वे वर्ष आहे. अशा प्रसंगी तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करने हा उद्देश होता.
या शिबिराच्या वेळी प्रत्येक रक्त दात्याला प्रमाणपत्र व “पर्यावरण घरोघरी” हे पुस्तक देण्यात आले. सलग 67 वेळा रक्तदान करणारे उत्तम दगडु महाकाळ यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरात 36 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन आजचे पहिले रक्तदाते रितेश गुल्हाणे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले. यावेळी विश्वनाथन नायर, रमेश बनगोंडे, राजेंद्र देशपांडे, अजित जगताप, वैदेही पटवर्धन, प्रदिप पाटील आदि मान्यवर उपस्थितीत होते.अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे अवाहन, अविनाश वैद्य यांनी केले. या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगत जनजागृतीही केली.