इंदोर मध्ये हॉटेलमधून जेवण करून निघालेल्या इतर धर्माचा तरुण व मुस्लिम तरुणीला, 40 ते 50 जणांच्या, मुस्लिम जमावाकडून मारहाण
भोपाळ : वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी इंदोर येथील हॉटेल मध्ये जेवायला गेले होते. बाहेर पडताच,एका टोळक्यानं रस्त्यात अडवलं. इतर धर्माच्या तरुणासोबत फिरुन मुस्लिम समाजाचं नाव खराब का करतेस, असा जाब त्यांनी तरुणीला विचारला.
मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. जवळपास 40 ते 50 तरुण टोळक्याने रस्त्यात धुडघूस घातला. त्यांनी या प्रेमी युगुलाला मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या रस्त्यामधील इतर लोकांवर देखील या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी गुंडगिरी करणाऱ्या तरुणांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
इंदूरमधील तुकोगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी भावेश सुनहरे त्याच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या नसरीन सुल्तानाला घेऊन बस स्थानकाजवळ असलेल्या मदनी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होता, त्यावेळी टोळक्यानं त्यांना अडववून भावेशकडे आधार कार्ड मागितलं आणि त्याला मारहाण करु लागले. नसरीननं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
तु या तरुणासोबत रात्री का फिरतेस? असा प्रश्न त्यांनी विचारल्यावर नसरीन म्हणाली आम्ही जेवायला आलो होतो.
जेवण ऑनलाईन ऑर्डर का नाही केलं? इतर धर्मातील व्यक्तीबरोबर जेवायला का गेलीस? असे प्रश्न विचारून धाक दाखवला,तु हिजाब परिधान करतेस, पण इस्लामचं पालन करत नाही. बुरखा घालून घरीच राहा, असं टोळक्यातील तरुणांनी तिला सुनावलं. दुसऱ्या धर्माच्या तरुणासोबत बाजारात फिरुन समाजाचं नाक कापताय. इस्लाम आणि शरियाचा कायदा लक्षात ठेव. बुरखा परिधान करुनच घरातून निघ, असे सल्ले टोळक्यानं तरुणीला दिले. नसरीनसोबत असलेल्या भावेशनं तरुणांना विरोध करताच त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. यावेळी तिथे ४० ते ५० जण जमले. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवत नसरीन आणि भावेश धेनू मार्केटला गेले. तिथून बाल विनय मंदिर शाळेच्या दिशेनं पळून गेले. टोळक्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांनी दोघांना मारहाण करत राजकुमार पुलाजवळ नेलं. तिथे जमलेल्या इतर लोकांनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर टोळक्यानं चाकूनं हल्ला केला. दोन तरुणांना चाकू लागला. भावेशला गंभीर इजा झाली. त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.