संसदेच्या नव्या भव्य इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन,ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल ‘ची ही स्थापना
संसदेच्या नव्या भव्य दिव्य इमारतीचे उद्घाटन व सोबतच लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल ‘ची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा व बहुधार्मिक प्रार्थना उच्चारून करण्यात आली.
यावेळी नवीन इमारतीच्या स्मरणार्थ फलकाचे अनावरणही मोदी यांनी केले. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अधेनाम द्रष्टे उपस्थित होते. द्रष्टे यांनी ‘सेंगोल’ प्रतीक पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले.
142 कोटी भारतीय जनतेच्या इच्छा पूर्ण झाल्या व हा एक ऐतिहासिक दिवस आहे अश्या भावना सर्व थरातून व्यक्त होत आहेत.
सात दशकांपासून ऐतिहासिक ‘सेंगोल’चे घर असलेल्या प्रयागराज संग्रहालयातील अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतील नवीन संसद भवनात त्यांचा अनमोल ठेवा हा त्यांच्यासाठी तसेच प्रयागराजच्या रहिवाशांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘सेंगोल’, सोन्याचा कोट असलेले चांदीचे बनवलेले चोल-युगीन राजदंड 1947 मध्ये ब्रिटिशांकडून झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे. आज ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित केल्याने त्याची किंमत कैक पटीने वाढली.