आमची बांधीलकी जुन्या संसदेशीच- पवार
शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मोदी सरकारवर टीका केली आहे. “नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला. तिथे जे काही धर्मकांड झाले. ते पाहून या कार्यक्रमाला न गेल्याचे आणखी समाधान झाले. पंडीत नेहरूंनी मांडलेल्या आधुनिक भारताची संकल्पना आणि आज जे झाले यात जमीन आस्मानाचा फरक आहे. आमची बांधीलकी जुन्या संसदेशीच आहे. तसेच जमालगोटाची भाषा शिंदेंनाच शोभते,” असे पवार म्हणाले.