September 28, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

हिंजवडी:सायबर गुन्हा: दाम्पत्याच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख 78 हजार रुपये गायब

हिंजवडी:सायबर गुन्हा: दाम्पत्याच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख 78 हजार रुपये गायब
बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून एक मेसेज केला व त्या व्यक्तीने एका दाम्पत्याला मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. कोणताही विचार न करता लिंक क्लिक केली व दाम्पत्याच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख 78 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार एक मार्च रोजी बावधन येथे घडला.
याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने सुमारे तीन महिन्यानंतर शनिवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8987904192 या मोबाईल फोन क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून लवकरात लवकर पॅनकार्ड अपडेट करा नाहीतर बँक खाते बंद होईल, अशी भीती घालणारे टेक्स्ट मेसेज वारंवार केले.

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीला मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले. दोघांनी मेसेज मधील लिंकवर क्लिक केले असता फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 88 हजार आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून तीन लाख 90 हजार 300 रुपये असे एकूण चार लाख 78 हजार 300 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल,महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्था प्रकल्पातील घटना.

pcnews24

अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अवैध वृक्षतोड.. कारवाईसही टाळाटाळ?

pcnews24

जास्तीचे पैसे लावण्यावरून जाब विचारला, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची ग्राहकाला मारहाण

pcnews24

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त- महानगर पालिकेची दिरंगाई?

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांना प्रशासकांकडून मंजुरी.

pcnews24

Leave a Comment