September 23, 2023
PC News24
राज्यवाहतूक

एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाचे महत्वपूर्ण पाऊल….अधिकृत थांब्यावर नाश्ता ३० रूपयांना मिळणार

एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाचे महत्वपूर्ण पाऊल….अधिकृत थांब्यावर नाश्ता ३० रूपयांना मिळणार

पुणे, एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवाशांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटीच्या अधिकृत थांब्यावर आता फक्त ३० रूपयांत नाश्ता मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता ३० रुपयांना द्यावा लागणार आहे.परंतु त्याचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता ३० रुपयात चहा-नाश्ता न दिल्यास हॉटेल चालक आणि अधिकृत बस थांब्यावर बस न थांबवल्यास चालक-वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच एसटी महामंडळाचे नाथजल छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नाथजल या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी १५ रूपये आकारण्यात येत आहे. यामध्ये विक्रेत्याने कुलिंग चार्ज अथवा इतर कारणाने छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारू नये असे आदेश महामंडळाने दिले आहेत.

Related posts

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या तीन मार्गांचे उद्घाटन- १ऑगस्ट पासून,पुणे-पिंपरी चिंचवड शहरे मेट्रोने जोडली जाणार

pcnews24

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

मेट्रोच्या तिकीट दरात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

pcnews24

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख आर्थिक मदत जाहीर

pcnews24

पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त जादा बसेसचे विशेष नियोजन.

pcnews24

घड्याळ चिन्ह वापरायचे असेल तर….

pcnews24

Leave a Comment