September 23, 2023
PC News24
अपघातपिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर:उघड्या डीपीला हात लागून अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

पिंपळे सौदागर:उघड्या डीपीला हात लागून अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

पिंपरी चिंचवड,पिंपळे सौदागर येथील जगताप कॉलनी येथे उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी भाजली गेली आहे.यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
आनंद विजयकुमार उमर्जीकर (वय 32, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 27 ) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डीपीला तार कंपाउंड न केल्याने तसेच डीपी व्यवस्थित बंद न केल्याने हा अपघात घडला.
फिर्यादी यांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना पिंपळे सौदागर येथील जगताप कॉलनी येथील सार्वजनिक शौचालया जवळ असलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या कंपाउंड मध्ये गेली. तिथे तिचा हात उघड्या इलेक्ट्रिक डीपीला लागला. त्यामध्ये मुलगी गंभीररीत्या भाजली गेली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts

महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन..

pcnews24

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त- महानगर पालिकेची दिरंगाई?

pcnews24

कंपनीमधील ॲल्युमिनियम साहित्याची चोरी …

pcnews24

आज सकाळी पुण्यात आग लागल्याचे वृत्त 

pcnews24

रहाटणी:छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पावित्र्य धोक्यात.

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

pcnews24

Leave a Comment