पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरती
पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याची माहिती दिली. 27 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 जून आहे. येत्या जुलै महिन्यात यासाठी परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.