पंतप्रधानांच्या हस्ते 75 रूपयांच्या नाण्याचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादिनी टपाल तिकिट आणि 75 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. आजचा दिवस कायम लक्षात राहावा याकरता हे अनावरण करण्यात आले आहे. या नाण्याचे वजन 34.65 ते 35.35 ग्रॅम आहे. या नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचा सिंह आहे. तर, डावीकडे देवनागरी लिपित भारत लिहिलेले आहे. तर, उजवीकडे India असे इंग्रजीत लिहिलेले आहे.