न्यायमूर्ती रमेश डि धानुका यांनी घेतली शपथ
न्यायमूर्ती रमेश डी धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी धानुका यांना पदाची शपथ दिली. 31 मे 1961 रोजी जन्मलेल्या धानुका यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आणि बॉम्बे विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले.